500+ सुविचार मराठी छोटे | सुविचार मराठी छोटे अर्थ | सुविचार मराठी छोटे Photo
सुविचार मराठी छोटे 100 | सुंदर सुविचार मराठी(छोटे सुविचार)
जिंकण्याची मजा तेव्हाच येते
जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात
मोटिवेशन सुविचार
मराठी भाषेत अनेक चांगल्या कल्पना आहेत. कालांतराने त्यांचा वापर कमी होत गेला. प्रत्येक चांगली कल्पना व्यक्तिमत्व विकास आणि संस्कृतीसाठी अमूल्य आहे. खरे तर चांगले विचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकार आहेत.
हा लेख सर्व मराठी भाषिक विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना आणि मराठीची विशेष आवड असणाऱ्यांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही. खाली आमच्याकडे या यादीतील 500+ पेक्षा जास्त सुविचार मराठी छोटे तसेच अनेक छोट्या कल्पना आहेत.
आज आम्ही मराठी सुविचार छोटे हा संग्रह घेऊन आलो आहोत. सुविचार मराठी छोटे तुमच्या जीवनात नवी ऊर्जा आणते. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठू शकता. येथे आम्ही New मराठी सुविचार लिहिला आहे, जो तुम्ही दररोज वाचू शकता आणि सकारात्मक विचाराने तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. चला तर मग एक चांगला Suvichar Marathi Chhote वाचूया.
50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे(चांगले सुविचार)
बागेची निगराणी करणारा माळी जर उत्कृष्ट असेल….
तर फळाफुलांचा ताटवा सदैव फुललेला व फळलेला राहिल…..
सुविचार मराठी छोटे |
Suvichar Marathi Status(Suvichar Marathi Images)
कल्पनेच्या कुंचल्याने अंतःकरणाच्या पटावर कोरलेले चित्र
भविष्यात प्रयत्नाने साकार झाल्याशिवाय रहात नाही.
बागेची निगराणी करणारा माळी जर उत्कृष्ट असेल तर फळाफुलांचा ताटवा सदैव फुललेला व फळलेला राहिल.
Suvichar in Marathi
संपत्तीने व समृद्धीने भरलेल्या घरात बोबडे बोल व दुडदुड धावणारी छोटी पावले नसतील तर त्या घराची आणि संपत्तीची किंमत सर्वस्वी व्यर्थ आहे.
विचार हा ज्ञानाचा आत्मा आहे आणि अविचार हा तमोगुणाचा अविष्कार आहे.
बाण जेथून सुटतो तेथे त्याची साक्ष राहत नाही.
लहानाना मोठे करण्यासाठी मोठ्याने लहान व्हावे लागते.
डॉक्टराने समाजाचे आरोग्य सांभाळायचे असते तर वकिलाने समाजाचे मन घडवायचे असते.
सुविचार मराठी छोटे 100 | सुविचार मराठी छोटे अर्थ
सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे
तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे.
मराठी सुविचार |
उद्याचा भविष्यकाळ आजच्या त्यागातून, कर्मातून निर्मावा लागतो.
मोठमोठ्या क्रांत्या तलवारीपेक्षा तत्वानीच घडवून आणलेल्या असतात.
तुमचा उद्याचा भविष्यकाळ हा आजचा वर्तमानकाळ आहे.
हृदयाची खरी आशा कधीच विफल होत नसते.
घटना घडून जातात पण जाता जाता पाठीमागे स्मृती ठेवून जातात.
उत्तम सौंदर्य म्हणजे मनाचे पावित्र्य.
सत्य आणि सत्ता यांचे फारसे जुळत नाही.
अस्ताला गेलेल्या सूर्याबरोबर त्याची तेजस्वी किरणेही लुप्त होतात.
सुविचार मराठी छोटे Photo | सुविचार मराठी छोटे 50 Pdf
भविष्यात घडणाऱ्या घटनांचा विचार करीत बसण्यापेक्षा
वर्तमानकाळातील घटनांचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
घडलेल्या घटनांचा उहापोह करत बसण्यापेक्षा घडणाऱ्या घटनांना धैर्याने सामोरे जा.
हातावरील रेषात दडलेले भाग्य शोधण्यापेक्षा मनगटातील कर्तृत्वाने ते खेचून घ्या.
वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हा ससा तरी मिळतो.
अभ्यास आणि अविरत कष्ट यामुळे अशक्य गोष्टीही शक्य होतात.
घोंगडीने काम भागत असेल तर रेशमी वस्त्रांचा हट्ट धरू नये.
कल्पनेच्या कुंचल्याने अंतःकरणाच्या पटावर कोरलेले चित्र भविष्यात प्रयत्नाने साकार झाल्याशिवाय रहात नाही.
पूर्वसंचिताने खेळ हे भागवे लागतात. या जन्मी तरी नाहीतर पुनर्जन्म घेऊन तरी.
मनुष्य जन्माला येतो तो खाली हातानेच आणि मरतो खाली हातानेच ईश्वरचरणी जातो, मग आयुष्यात मीपणा का करत असतो याचे उत्तर मात्र कोणीही देऊ शकत नाही.
50 सुविचार शालेय सुविचार मराठी छोटे(चांगले सुविचार)
शील ही जन्मभर पुरणारी आणि मृत्युनंतर पण
पुरून उरणारी संपत्ती ✨ आहे.
कटू गोष्ट विसरण्याचे कितीही ठरविले तरी मनाची मिटलेली तरी कटू पाने कधी तरी फडफडतातच आणि पुन्हा एकदा मनात द्वेषाचे प्रज्वलित 🔥 होत.
माणूस कितीही सहनशील असला तरी त्याच्यासहनशीलतेला मर्यादा असते.
जगात प्रत्येक गोष्टीला पुरक गोष्ट आहे, पण एकच गोष्ट अशी आहे की तिला पुरक काहीच नाही आणि ती म्हणजे आईचे प्रेम.
वनस्पतींना जसे ऊनप्रकाश आणि पाणी यांचे शिंपण करून वाढवता, तसेच लहान मुलांचे मित्र बना त्यांच्याशी लहान होऊन लहानाप्रमाणे वागा आणि हीच रोपटी मोठी करा. त्यांना संस्कारक्षम नागरिक बनवा.
Happy Life Status in Marathi(Happy Life Quotes Marathi)
बरा-वाईट भूतकाळ उगाळत बसण्यापेक्षा भविष्यकाळात वाईटातून चांगले कसे निर्माण करता येईल व वर्तमानकाळ अधिक सुखाचा कसा जाईल? हे शोधणे अधिक चांगले.
ज्यांना खाण्या-पिण्याची भ्रांत आहे अशा व्यक्तींना पोटभर जेऊखाऊ घातलंत तर तो याचक संतुष्ट होऊन आशिर्वाद तरी देईल व तुम्हाला पण अन्नदानाचे पुण्य लाभेल.
कर्म हीच पूजा, कर्म हीच उपासना.
जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.
ज्याच्या गरजा कमी, आणि स्वास्थ्य अधिक.
सुविचार मराठी मध्ये छोटे फोटो(Suvichar Marathi Chhote)
भूकेने व तहानेने कासावीस झालेल्या माणसास बोधामृत पाजण्यापेक्षा
अन्नाचे चार घास व पाण्याचा घोट देणे अधिक योग्य.
संधी कधीही दार उघडून येत नाही पण ती जेव्हा तुमचे दार ठोठावते तेव्हा तुम्ही दार उघडता की नाही यावर तुमचे पुढील भवितव्य अवलंबून असते.
अन्नाचा घास जास्तीत जास्त तुमच्या तोंडात भरवता येतो पण तो घास गिळण्याचे काम मात्र तुम्हालाच करावे लागते.
मोठमोठ्या पुढाऱ्यांचे स्मारक/पुतळे बांधून पैशाचा विनाश करण्यापेक्षा तोच पैसा गोरगरिबांना अन्नदानार्थ व गरीब अनाथ मुलांच्या शिक्षण कार्यासाठी वापरला तर त्या पैशांचा योग्य विनियोग होईल, तुम्हाला पुण्य लागेल आणि त्या स्वर्गीय सुधारकाच्या आत्म्याला पण शांती लाभेल.
Good Morning Life Quotes Marathi
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
मराठी सुविचार |
दुष्टांच्या प्रवृत्तींना क्षमा करणे म्हणजे सापाला दूध पाजण्यासारखेच.
स्त्रीला तुच्छ समजून वागवण्यापेक्षा लक्ष्मीचे स्थान दिलेत तर घरात वैभव फुलेल.
Chote Marathi Suvichar(सुविचार मराठी छोटे)
हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे
मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
पॉझिटिव्ह मराठी सुविचार |
शिक्षण हे साध्य नाही, साधन आहे. नवचैतन्य, नवसंस्कृती, नवमानव आणि नवसमाज शिक्षणातून निर्माण करावयाचा असतो.
विद्यार्थी स्वाभिमानी पाहिजे तो न्यायाची चाड व अन्यायाची चीड बाळगणारा हवा.
विद्यार्थ्याने नुसते डोक्यावरचे केस वाढवायचे नसतात तर त्याने डोक्यातील विचार वाढवायला हवेत.
मला ओसाड जमीन द्या मी तिथे नंदनवन फुलवेन.
Happy Married Life Status in Marathi
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
पॉझिटिव्ह मराठी सुविचार |
कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला तिची किंमत वाटत नाही.
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सांडलेला रक्ताचा एकेक थेंब हे जगातले सर्वात मौलयवान रत्न होय.
माणूस आजारी पडला की त्याला डोक्टराकडे न्या. कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी भगत देवऋषि यांच्याकडे जाऊ नका अंगारे धुपारे करू नका.
सुविचार मराठी छोटे(Chote Suvichar Marathi)
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
पॉझिटिव्ह मराठी सुविचार |
दातृत्व हा निसर्गाचा गुण आहे पण स्वार्थ आणि दुष्टावा हा मानवाचा अवगुण आहे.
कडू गोळीसेवन केल्यानंतर तोंडाचा कडूपणा जाण्यासाठी त्याला साखरेची गोडी आवश्यक आहे.
तुमच्या भाषेत मृदुता ठेवा. जसे हा माझा बाप आहे असे बोलण्यापेक्षा हे माझे वडिल आहेत असे ऐकणे फार चांगले वाटते.
Happy Life Quotes in the Marathi Language
उषा आणि निशा
जशा दिवसाच्या साथीदार आहेत तसे
सुख दुःख माणसाचे सोबती आहेत.
पॉझिटिव्ह मराठी सुविचार |
मीठ हे जेवणात रूचीला आवश्यक गोष्ट आहे, पण तेच मीठ दूधात घातले तर दूध नासून जाते.
मुलांनो तुम्ही उद्याच्या जगाचे शिल्पकार आहात. जे आमच्या हातून घडले नाही ते तुम्ही करून दाखवा.
Chhote Suvichar Marathi(सुविचार मराठी छोटे)
अवघड क्षणीही न डगमगता जो अचूक निर्णय घेतो
तोच जीवनाच्या लढाईत जिंकतो.
पॉझिटिव्ह मराठी सुविचार |
हसल्याचं मोल काय आहे हे रडल्यावर कळतं.
असत्याला कितीही प्रतिष्ठा असली तरी असत्याच्या बुरखपा फाडून जगाला दाखवला पाहिजे.
जीवनात प्रेम हे केव्हा केव्हा मिळत असतं.
अभिजात कलाकृती निर्माण करणाऱ्या अनेक हतभागी कलावंतांची खरी किंमत कळते ती त्यांच्या मरणानंतर.
Happy Married Life Quotes Marathi
तोंडातून गेलेला शब्द व धनुष्यातून सुटलेला बाण हा कधीही परत येत नाही.
विचार मराठी छोटे |
कलात्मकता ही कोणत्याही प्रसंगात केव्हाही प्रकट होत नसते.
अस्वस्थ वृत्ती कर्तृत्वाला जन्म देते.
वास्तवतेपेक्षा कृत्रिमता आकर्षक वाटत असते. वास्तवतेपेक्षा कृत्रिमता हाताळणे ही जास्त सुलभ असते, पण कृत्रिमता ही वाङ्मयाची वैरीण आहे हे विसरू नका.
सुविचार मराठी छोटे(Suvichar Marathi Chote)
स्वप्न ही रंगविण्यासाठी असतात कारण स्वप्न सत्यात साकारणे फार कठीण असते.
सुविचार मराठी छोटे |
व्यक्तीच्या हिताहून वेगळे समाजाचे हित नाही.
सामाजिक सुधारणांबरोबर राजकीय सुधारणाही आवश्यक आहेत.
भाषण व वर्तन यांतील परस्पर विरोध हा आमच्या लोकांचा राष्ट्रीय दोष आहे.
सगळ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो.
आपल्या दरिद्री व अज्ञानी बांधवांची सेवा करणे हे प्रत्येक सुशिक्षिताचे पहिले कर्तव्य होय.
Good Life Quotes Marathi(feeling Happy Quotes Marathi)
प्रेम सर्वांवर करा
विश्वास थोड्यांवर ठेवा
पण व्देष मात्र कोणाचाच करू नका.
सुविचार मराठी छोटे |
जिथे धाडस तेथे वैभव.
माता स्वतःचा मान जाणत नाही, ती जाणते माया.
मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसतो.
मनापासून आणि एकाग्रतेने काम केले की जीवन यशस्वी होते.
यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.
ज्ञानाचा संचय केल्याने ते कमी होते, परंतु ते दुसऱ्याला दिल्याने अधिक वाढते.
क्षमा म्हणजे ब्रह्म, क्षमा म्हणजे सत्य, क्षमा म्हणजे भूत, क्षमा म्हणजे भविष्य, क्षमा म्हणजे पावित्र्य होय. या संपूर्ण जगताला क्षमेनेच धारण केले आहे.
Marathi Suvichar Chote Chote(सुविचार मराठी छोटे)
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
सुविचार मराठी छोटे |
क्षुद्र माणसे नेहमीच अति चिकित्सक असतात.
अपमानाच्या पायांवरून ध्येयाचा डोंगर चढावा लागतो.
आचाराच्या उंचीवर विचाराची भव्यता अवलंबून असते.
आत्मविश्वास हेच संरक्षणाचे साधन आहे.
गुलामगिरी नष्ट करावयाची असेल तर माणूस हा माणूस व्हावा लागतो.
खर्च करून आवक शोधण्यापेक्षा आवक पाहून खर्च करावा.
क्रोधावर विजय मिळवाल तर बुद्धी टिकून राहील.
100+Attitude Quotes in Marathi(Life Quotes in Marathi)
आनंदी मन
सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा
ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
सुविचार मराठी छोटे |
उद्योगप्रियता, बुद्धिमत्ता आणि सातत्य यामुळेच कीर्ती लाभते.
कायदा आंधळा, नीती पांगळी आणि समाज बहिरा असतो.
काचेसारखे तकलादू बनू नका तर हिरकणी व्हा.
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
तुमच्या हातून चूक झाली तर जरूर होऊ द्या, पण तीच चूक पुन्हा त्याला सुख होणार नाही याची दक्षता घ्या.
निसर्गावर हुकूमत गाजवायची असेल तर त्याच्या आज्ञेचे पालन करा.
मोहाचे पाश नेहमीच पराक्रमाला बांध घालीत असतात.
पतंगासारखी माणसाची स्थिती असते. शीलाची दोरी जोपर्यंत मजबूत आहे, तोवर दिमाखाने वरवर जावे, अनंतात स्वैर भरारी मारून सूर्यबिंबाला स्पर्श करण्याची उमेद धरावी, पण ती दोरी तुटली, तर त्याचा अधःपात कुठल्यातरी खातेयात होणार हे निश्चित!
Motivational Quotes in Marathi for Success
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
सुविचार मराठी छोटे |
जे कसलीच अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान, कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही.
विद्या हे मौलिक व अक्षय धन आहे. विद्या म्हणजे कामधेनू आहे. विद्येवाचून जीवन फुकट आहे. विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार.
सौंदर्य-सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुद्ध अंतःकरणाने गुणा, परनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा, हेच आपल्या सुखी जीवनाचे गणित आहे.
सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव. सत्याचा त्याग करू नये.
संधी तुमचा दरवाजा ठोठावत असते पण आपल्याला कळले पाहिजे की हीच संधी आहे. हीचा आपण लाभ घेतला पाहिजे.
सकाळचे जाग आल्यावरचे क्षण नेहमी शुद्ध असतात.
निर्लेप असतात,
दिवसाच्या कटकारस्थानांचा, कपाटांचा,
खोटेपणाचा थर त्यावर चढलेला नसतो.
निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनतात तर पॉझिटिव्ह विचार माणसाला नेहमी बलवान बनवतात.
एक वेळ शरीराने कमजोर असेल तर चालेल पण मनाने कधीच कमजोर होऊ नका.
यश त्यांना मिळते ज्यांची इच्छा शक्ती प्रबळ असते व आत्मविश्वास मजबूत असतो.
‘मी’ बोलाल तर एकट्याने काम करायची वेळ येते.
‘आपण’ बोलल तर लोक आपलं समजून तुमच्यासाठी काम करतील.
यशस्वी व्हायचे असेल तर आतीविचार, न्यूनगंड,
नकारात्मकता, आळस, भीती, सबबी, राग, द्वेष,
चिडचिडेपणा या गोष्टीपासून सदैव दूर राहा.
उत्तम नेतृत्वासाठी कल्पकता, सर्जनशीलता, प्रयोगशीलता,
गतिशीलता, सत्यवचनी, नीतिमान,
विश्वासार्हता, कृतज्ञता, हजरजबाबी,
जिज्ञासू, धैर्यशील, संयमी, दूरदृष्टी,
साहसी असे गुण आवश्यक असतात.
ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीच अयशस्वी होत नाही.
स्वयंशिस्त हा महत्त्वाचा गुण आहे याची सुरुवात तिथूनच होते.
Short Happy Quotes Marathi(Smile Quotes Marathi)
ज्ञानी माणसाबरोबर एकदाच केलेले संभाषण हे
पुस्तकाचा अभ्यास करण्यापेक्षा जास्त सरस आहे.
सुविचार मराठी छोटे |
स्वतःचा स्वतःवर विश्वास असणे हा यशाच्या मार्गातील पहिला टप्पा आहे.
आवड व आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
तुम्ही कितीही हुशार असाल पण जर,
तुम्हाला माणसांशी कसं वागायचं ते माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही.
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
मोठी स्वप्ने पहा कारण तीच माणसाचं रक्त ढवळू शकतात.
अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.
कोणत्याही परिस्थितीत माघार न घेणे हाच आपल्या यशाचा पासवर्ड आहे.
योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट,
योजना अमलात आणतांना आपली दहा मिनिटे वाचवतो.
म्हणून कामाचे नियोजन करा.
हे पण वाचा:-
मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला सुविचार मराठी छोटे तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.
या लेखातील या सुविचार मराठी छोटे संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.
यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.